तटरक्षक दलातर्फे अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा

 

रत्नागिरी: तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर तस्करीच्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, भारतीय तटरक्षक दलाने सीमाशुल्क आणि रत्नागिरी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्माण महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात अनुक्रमे 23 जून 23 आणि 26 जून 23 रोजी येथे व्याख्याने आयोजित करून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला. या सामाजिक समस्यांच्या दूरगामी परिणामांबद्दल विद्यार्थी आणि अध्यापक यांना अवगत करणे आणि अंमली पदार्थ मुक्त व सुरक्षित वातावरणास प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमांचा उद्देश होता. यावेळी नवनिर्माण महाविद्यालयाचे सुमारे 60 विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे 70 विद्यार्थी या व्याख्यानांमध्ये सहभागी झाले होते.

 

मादक पदार्थांच्या दुरुपयोगाचे धोके, अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीचे गुंतागुंतीचे जाळे, जागतिक स्तरावर अंमली पदार्थांच्या दुरुपयोगाच्या समस्येचे प्रमाण दर्शविणारी चिंताजनक आकडेवारी, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींच्या सहकार्याने सर्वसमावेशकपणे सोडवण्याची निकड आणि सार्वजनिक दक्षतेचे महत्व यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला. अंमली पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्याचे गंभीर असे सामाजिक आणि आर्थिक परिणाम देखील होतात यावर वक्त्यांनी जोर दिला. वक्त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित केले.

 

कर्तव्यांच्या यादीमध्ये निहित असलेली जबाबदारी म्हणून, भारतीय तटरक्षक दल हे, सीमाशुल्क आणि इतर अंमलबजावणी एजन्सींच्या समन्वयाने, राष्ट्राच्या समुद्री सीमेतून प्रतिबंधित यादीतील अवैध वस्तूंची वाहतून टाळण्यासाठी नियमितपणे ऑपरेशन्स हाती घेते. म्हणूनच, समुद्रातील कर्तव्यांच्या एक पाऊल पुढे टाकत तटरक्षक दलाने तरुणांना अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी यांच्या धोक्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि व्यक्ति विकासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी अनुकूल असे मादक पदार्थमुक्त वातावरण तयार करण्यासाठी समाज घटकांना सकारात्मकरित्या सहभागी करून घेण्याण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.