राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी संगमेश्वरच्या तायक्वांडो पट्टूंची निवड.

देवरुख.( प्रतिनिधी) : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व मुंबई तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन च्या मान्यतेने कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि.30 जुन ते 2 जुलै मुंबई विद्यापीठ मुंबई या ठिकाणी संपन्न होत असून या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहेत.

संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब चे खेळाडू सान्वी रसाळ, सान्वी जागुष्टे हे 2 खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहामध्ये संपन्न झाला.त्यावेळी नगरपंचायत तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, सौ ॲड.पूनम चव्हाण, संदेश जागुष्टे, चिन्मय साने, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आम डॉ. सुभाष बने, जि. प माजी अध्यक्ष रोहन बने, माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये. माजी उपनगराध्यक्ष वैभव पवार, तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, आदींनी शुभेच्छा दिल्या.