साळवीस्टॉप कमानीजवळ दुचाकी आणि एसटीचा अपघात; दुचाकीस्वार गंभीर

रत्नागिरी : प्रतिनिधी l शहरातील साळवीस्टॉप कमानीजवळ सोमवार 26 जून रोजी दुपारी 3.15 वा.सुमारास दुचाकी आणि एसटीची धडक होउन अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार गंभिर जखमी झालेला असून त्याला उपचारांसाठी चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.सोमवारी दुपारी रत्नागिरी ते इचलकरंजी जाणारी एसटी (एमएच-14-बीटी-3407) रत्नागिरी आगारातून इचलकरंजीला जात होती.ती साळवीस्टॉप कमानीजवळ आली असता दुचाकी आणि एसटीची धडक होउन हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस आणि एसटी विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताच पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु होती.