विविध विभागातील पदाधिकाऱ्यांच्या केल्या नियुक्त्या
चिपळूण l वार्ताहर :फुड अँड ड्रग्स कंजूमर वेल्फेअर कमिटी यांची चिपळूण येथे रविवार दिनांक 25 रोजी हॉटेल ओएसिस या ठिकाणी सभा पार पडली. या सभेला कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे उपस्थित होते . यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून त्यांना निवड पत्र देण्यात आले.
फूड अँड ड्रग्स कंजूमर वेल्फेअर कमिटी ही ग्राहक संरक्षण हक्क कायदा 2019 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राष्ट्रीय स्तरावर कार्य करीत आहे. या संस्थेचे मुख्य ध्येय मानवी आरोग्याची आणि समाजाची एकूणच सुरक्षितता घेणे आहे . ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ग्राहकांना तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक पैलू, आणि कायदेशीर प्रक्रियेस त्यांना शिक्षित करणे हा मुख्य दृष्टिकोन या संस्थेने ठेवला आहे. ग्राहकांची सुरक्षितता महत्त्वाची असून याच तत्त्वाखाली ही कमिटी कार्यरत आहे. चिपळूण येथे या कमिटीची रविवार २५ रोजी सभा झाली .यावेळी जिल्हाभरातून अनेक पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. नवीन आलेल्या सर्व सभासदांना पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या कामकाजाविषयी वरिष्ठ पदाधिकारी यांनी माहिती करून दिली. यावेळी कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे यांनी या फूड अँड ड्रग्स कंजूमर वेल्फेअर कमिटीच्या विविध संलग्न शाखा विभागांमध्ये काम केले जाते त्यांची सुद्धा माहिती दिली. यामध्ये ग्राहक सुरक्षा,आरोग्य, महिला व बालकल्याण, प्रदूषण नियंत्रण समस्या, कृषी कला व क्रीडा, खाद्य महोत्सव स्पर्धा, पशुसंवर्धन विभाग , सौंदर्य प्रसाधन विभाग बंदरे व मत्स्य विभाग , या संदर्भातली त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर या सभेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे, सरचिटणीस जयवंत दामगुडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप नाईक, प्रभारी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक निकाळजे, यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. ग्राहकांच्या हक्काविषयी जागृता निर्माण करून त्यांची कुठे फसगत होत असेल तिथे न्याय मिळवून देण्यासाठी ही कमिटी काम करत आहे. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण ही सुद्धा एक काळाची गरज आहे .त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या कमिटीमार्फत प्रदूषण नियंत्रण विभागाचे कामकाज केले जात आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत सुद्धा गावागावात जाऊन जनजागृती करून महिलांना शिक्षित करणे, गरजूंना रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात स्तन कर्करोग शस्त्रक्रिया उपचारात मदत करण्याचा प्रयत्न सुद्धा ही कमिटी करत आहेत. समाज उपयोगी कार्य करत फूड अँड ड्रग्स कंजूमर वेल्फेअर कमिटी कामकाज करत आहे.
चिपळूण येथील सभेला शंभर पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष डॉ बुरान कुरवळे, प्रदूषण विभागाचे खेड तालुका अध्यक्ष सागर सुर्वे , आणि प्रणित साळुंखे यांनी विशेष सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले. कोकण विभागाचे अध्यक्ष दयानंद निकम यांनी सुद्धा येथील सभेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे, राष्ट्रीय सरचिटणीस जयवंत दामगुडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप नाइक, प्रभारी अध्यक्ष अशोक निकाळजे, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अध्यक्ष सुरेंद्र मर्चंडे, कृषी विभाग वामन कदम व कोकण विभागीय अध्यक्ष दयानंद निकम आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते .या सभेचे बहारदार सूत्रसंचालन प्रदूषण विभागाचे पदाधिकारी संजय बुरटे यांनी केले.