राजापुरात शिवसेनेचा उ. बा. ठाकरे गटाला दणका

 

युवा सेना पदाधिकारी व महिला संघटनेच्या अनेक महिला शिवसेनेत दाखल

राजापूर l प्रतिनिधी :राजापुरात पुन्हा एकदा शिवसेनेने उ. बा. ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे. शहरातील युवा सेनेचे पदाधिकारी प्रज्योत खडपे याच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. तर उ. बा. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी शुभांगी डबरे यांसह अनेक महिलांनी उ. बा. ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू यांनी पत्रकारांना दिली आहे.

या सर्व प्रवेशकर्त्यांचे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पक्षात स्वागत केले.

शिवसेनेचे तालुका अशफाक हाजू, शहर अध्यक्ष सौरभ खडपे यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला आहे. प्रवेशकर्त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षात योग्य स्थान देऊन त्यांचा सन्मान केला जाईल अशी ग्वाही यावेळी ना. सामंत यांनी दिली.

या प्रवेशकर्त्यांमध्ये सौ. शुभांगी आदिनाथ डबरे, सौ. संतोषी संजय पुजारे, सौ. स्वाती संतोष पुजारी, सौ. दिपीका दिपक पुजारी, सौ. दिप्ती राजाराम पुजारी सौ. सुवर्णा चंद्रकांत राऊत, कलावती रामचंद्र जोगले, सौ.स्नेहलता शिवाजी जोगले, सौ. रंजना संजय पुजारे, नंदा यशवंत पुजारे या महिला आघाडीच्या महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

तर शहरातील युवा सेनेचे पदाधिकारी प्रज्योत जयदीप खडपे, तन्मय परब, अभिषेक अनंत चव्हाण, साई बिजीतकर प्रशांत करंबेळकर, हर्ष दुधवडकर, तेजस भांबुरे, अक्षय कोठारकर व सौरभ पेडणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

याप्रसंगी अशफाक हाजू, सौरभ खपडे उपतालुकाप्रमुख नाना कोरगांवकर आदिनाथ आप्पा डबरे बालकुष्ण तानवडे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो 27 आरजेपी 1।2

राजापुरातील उ. बा. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करताना ना. उदय सामंत तर दुसऱ्या छायाचित्रात युवा पदाधिकारी प्रज्योत खडपे व युवकांचे शिवसेनेत स्वागत करताना ना. उदय सामंत.

——————————–