नागरीकांनी सोडला सुटकेचा निश्वास
राजापूर l प्रतिनिधी :शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणात झालेला खडखडाट त्यातच लांबलेला पाऊस यामुळे गेले दोन ते अडीज महिने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या राजापूरवासीयांना सक्रिय झालेल्या मान्सूनने मोठा दिलासा दिला आहे. कोदवली धरण तुडुंब भरल्याने आता शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत पुर्ववत नियमीत करण्यात आला आहे. तशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राजापूकरांना तीव्र पाणीटंचाईची झळ सहन करावी लागली आहे. मार्चमध्येच कोदवली धरणात खडखडाट केवळ शिळ जॅकवेलवरच शहराचा पाणीपुरठा अवलंबून होता. मात्र शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रारंभी एक दिवसाआड तर त्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र पाऊस लांबल्याने आणखीच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या व अनेक भागात तीन ते चार दिवस आड पाणीपुरवठा होत होता.
या काळात राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमिर खलिफे यांनी शहरात नागरीकांना टँकरने पाणीपुरठा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर नगर परिषद प्रशासनाकडूनही मुख्याधिकरी भोसले व कर्मचाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठा शहरात पुरवीण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.
अखेर आता मान्सून सक्रीय झाला असून कोदवली धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. धरण पुर्णपणे भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आता सर्वच ठिकाणच्या साठवण टाकीत मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता शहरातील सर्व भागात पुर्ववत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगपरिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
फोटो 27 आरजेपी 3
राजापूर शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणारे कोदवली धरण तुडुंब भरले आहे.