श्री देव व्याडेश्वर देवस्थान २९ रोजी गायन मैफल

माखजन |वार्ताहर :   गुहागर येथील प्राचीन व अनेकांचे श्रध्यस्थान असलेल्या श्री देव व्याडेश्वर मंदिरात २९ जून रोजी अशा आषाढी एकादशी निमित्त ‘नाट्य-अभंग रंग’ ही अभंग, भक्तीगीत व नाट्य गीतांची सुरेल मैफिल होणार आहे.

या मैफिलीत शमिका भिडे,विशारद गुरव,अभिजित भट गाणार आहेत.यावेळी

हार्मोनियम ची साथ वरद सोहनी,

तबला केदार लिंगायत

पखवाज पुष्कर सरपोतदार तर

तलवाद्या ची साथ हरेश केळकर करणार आहेत तर निवेदन प्रख्यात निवेदक निबंध कानिटकर करणार आहेत.

ही मैफिल देवस्थान च्या परशुराम सभागृहात रात्री ९.३० वाजता होणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ने केले आहे.