मुणगे कारीवणेवाडी शाळेत वह्या आणि छत्री वाटप कार्यक्रम !

 

 

मसुरे | झुंजार पेडणेकर :संघर्ष मित्र मंडळ आणि यशस्विनी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने मुणगे कारीवणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कारीवणे ग्रामस्थांना छत्री वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारिवणे येथील शिक्षक श्री सुंदर गराटे यांची बदली झाल्यामुळे त्यांचाही सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रम संघर्ष मित्र मंडळ आणि यशस्विनी प्रतिष्ठानचा सल्लगार,मार्गदर्शक,प्रभाग क्रमांक एक सदस्य सौ.रवीना मालाडकर आणि सौ. देवयानी राणे यांच्या सहकार्याने करण्यात आला.कारीवणे ग्रामस्थांनी आभार मानले.