रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील दोघांची ऑनलाईन पध्दतीने तब्बल 1 लाख 97 हजार 738 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीच्या या घटना बुधवार 21 जून ते सोमवार 26 जून या कालावधीत कोकणनगर आणि मिरकरवाडा येथे घडल्या आहेत.
याप्रकरणी फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोकणनगर येथील फिर्यादीच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन करुन मी अॅक्सेस बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डबाबत माहिती देउन त्यांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर टेक्ट मेसेजव्दारे एक लिंक पाठवून फिर्यादीच्याच के्रडिट कार्डची माहिती घेउन 98 हजार 259 रुपये काढून फसवणूक केली.तर मिरकरवाडा येथील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर फोन करुन एक लिंक पाठवून त्या फिर्यादीची माहिती भरुन घेत त्यांच्या बँक खात्यातून 99 हजार 479 रुपये ऑनलाईन पध्दतीने काढून घेत फसवणूक केली.याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही अज्ञात संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 420,माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (क)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.