खानोली येथे भरली ज्येष्ठांची शाळा….

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने “मोदी@९” अभियानांतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन संपन्न..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला तालुक्यातील निसर्ग वैभवाने नटलेला खानोली गाव. वेंगुर्ला आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. गावातील आणि गावाच्या आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमधून आपले मित्र मैत्रिणी भेटणार म्हणून डोळ्यात पंचप्राण आणून ज्येष्ठांचे हळूहळू आगमन होत होते. कोणी चालत, कोणी सायकलवरून, कुणी मुलाच्या दुचाकीवर मागे बसून तर कोणी चार चाकी वाहने शेअर करून कार्यक्रम स्थळावर पोहोचत होते आणि ते ठरलेल स्थळ होत खानोली येथील शरद चव्हाण यांचे निवासस्थान.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि सरपंच प्रणाली खानोलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रास्ताविक केल्यानंतर निमंत्रित अजित राऊळ यांनी आपल्या मनोगतास सुरुवात केली. निमित्त होते पंतप्रधान मोदीजींच्या कारकिर्दीला नऊ वर्ष झाल्याचं!
इंग्लंडमध्ये एक पंतप्रधान होऊन गेले ज्यांचे नाव ग्लॅडस्टन असे होते. त्यांची एक उक्ती प्रसिद्ध होती.ते म्हणायचे”आपण पिकलेल्या केसांचा मान ठेवला पाहिजे. इतकंच म्हणून ते थांबत नसत तर पुढे,” विशेषतः आपल्या स्वतःच्या पांढऱ्या केसांचा मान ठेवला पाहिजे”असे ते आवर्जून म्हणत असत याची आठवण करून देऊन उपस्थित पांढरे केस असणाऱ्यांचे अजित राऊळ यांनी स्वागत व प्रबोधन केले. स्वतःच्या अनुभवाला आलेल्या गोष्टी सांगत त्यांनी मोदीजींच्या पिकल्या केसांचा आपण सन्मान केला पाहिजे याची जाणीव करून दिली.
देशात शौचालय फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे विशेषत: मुलींची आणि स्त्रियांची सुरक्षितता वाढली असून त्यांचा स्वाभिमान देखील उंचावला असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. २०१४ साली ग्रामीण भागात शौचालयांचे प्रमाण केवळ ३९% असल्याचे सांगून २०२३ मध्ये ते शंभर टक्के झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले .उज्वला गॅस पुरवठ्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला, तर आयुष्मान भारत योजनेत रुपये पाच लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळू लागले याची त्यांनी आठवण करून दिली.
देश विदेशात मोदीजींनी आपल्या देशाची प्रतिष्ठा खूपच उंचावली आहे आणि म्हणूनच २०२४ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत मोदीजींना निर्णायक बहुमतापर्यंत नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले भाजपा वैद्यकीय आघाडी चे कोकण प्रभारी डॉ.अमेय देसाई व अटल प्रतिष्ठान चे नकुल पार्सेकर यांनी आपले विचार,आठवणी व्यक्त केल्या. नंतर राजन तेली यांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमोद महाजन व माधव भंडारी यांच्या भेटीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून त्यांच्या स्मरणशक्तीचे व सामाजिक जाणिवेचे भरभरून कौतुक केलेच शिवाय मोदीजींच्या कार्याचा सर्वंकष आढावा घेऊन ‘हर घर मोदी’ या घोषणेचा विसर पडू न देण्याचे आवाहन केले. यावेळी ९३ वर्षाचे भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते गुरुनाथ मेस्त्री यांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठांसाठी खास भरवलेल्या या शाळेत प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत तांडेल , ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , ता.चिटणीस समीर कुडाळकर व नितीन चव्हाण , विजय नाईक , सरपंच प्रणाली खानोलकर , उपसरपंच सुभाष खानोलकर , सुनील घाग , वसंत परब , शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे व शामसुंदर मुननकर , रविंद्र शिरसाठ , सुर्यकांत परब , आनंद परब , तात्या केळजी , ओंकार चव्हाण , सुनील सावंत , अजित राऊळ सर , भाऊ बागायतकर , बाबा राऊत , भानुदास शिरगांवकर , प्रथमेश सावंत , संदिप खानोलकर , पांडुरंग सावंत, विलास सावंत , सागर सावंत, प्रकाश सावंत , शुभम सावंत , बाळु सावंत , राजा खानोलकर, केशव राऊळ , सिद्धेश्वर प्रभुखानोलकर , विनायक प्रभू , सुभाष राऊळ , सौ. मानसी मेस्त्री तसेच इतर अनेक जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.