रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी नागेश बेर्डे

 

व्हाईस चेअरमन पदी गणेश आईनकर यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत रत्नागिरीच्या आज झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूकीमध्ये चेअरमन पदी सहकार पॅनलच्या श्री. नागेश बेर्डे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सहकार पॅनलच्या श्री. गणेश आईनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील श्री. सुधीर कांबळे साहेब यांनी काम पाहिले.
सदर निवडणूकीसाठी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेचे नूतन संचालक श्री. संतोष गमरे, श्री. विकास बैकर, श्रीम. अनुष्का कुळकर्णी, श्रीम. अरूणा वाघाटे, श्रीम. समिक्षा तळेकर, श्री. नागेश बेर्डे, श्रीम. मंजिरी वाडेकर, श्री. संतोष कांबळे, श्री. ताश्कंद तांबे, श्री. संतोष म्हेत्रे, श्री. कमलेश कामतेकर, श्री. नरेंद्र चव्हाण, श्री. संतोष पालशेतकर, श्री. सुयोग जाधव, श्री. गणेश आईनकर व श्री. विजय दुर्गवले हे उपस्थित होते.
याप्रसंगी नवनियुक्त चेअरमन श्री. नागेश बेर्डे व व्हाईस चेअरमन श्री. गणेश आईनकर यांचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. दिनेश सिनकर, सल्लागार श्री. संजयराव कांबळे व श्री. समीर इंदुलकर, माजी अध्यक्ष श्री. वामनराव कदम तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व सभासद बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले.
रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत रत्नागिरीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पुरस्कृत सहकार पॅनल चे 16 पैकी 12 संचालक निवडून आले होते.
एकूण 16 संचालक पदांपैकी सहकार पॅनेलचे 12, परीवर्तन पॅनेलचे 3 व अपक्ष 1 असे 16 संचालक निवडून आले आहेत.