रत्नागिरीत आज अभंगवाणी कार्यक्रम रंगणार

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच उद्या (ता. 28) संध्याकाळी 6.30 वाजता अभंगवाणी हा कार्यक्रम रंगणार आहे. रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीमधील संगीत प्रेमी कलाकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम शेरे नाका येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात संध्याकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत होणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी अवश्य या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक हेरंब जोगळेकर आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.