तहसीलदार कार्यालय देवरुख येथे होणार जनता दरबार
रत्नागिरी l प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तालूका स्तरावर जनता दरबारचे आयोजन केले जाते.त्यानुसार संगमेश्वर तालुक्यातील सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दि.१ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसीलदार कार्यालय देवरुख येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये सर्व सामान्य माणसांचे छोटे मोठे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
सकाळ पासून हा जनता दरबार सूरू होणार असुन जनतेचे अर्ज स्वीकारले जातील त्यांना टोकन दिले जाईल आणि टोकन नुसार पालकमंत्री उदय सामंत प्रत्येक अर्जदाराच्या अर्जाचे वाचन करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत.या जनता दरबार मध्ये जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी,स्वतः जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,सर्व विभागाचे प्रमुक उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील जनतेने आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी यां जनता दरबारचा लाभ घ्यावा असे अहवान स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांनी केले आहे.












