संबंधित ट्रक चालकाला पंधरा दिवसांची ठोठावली कोठडी
लांजा (प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे झालेल्या अपघात प्रकरणी कोर्टातील तारखांना हजर राहत नसल्याने लांजा न्यायालयाने काढलेल्या अटक वाॅरंट नुसार लांजा पोलिसांनी कंटेनर चालकाला राजस्थान अजमेर येथून ताब्यात घेतले आहे त्याला आज मंगळवारी २७ जून रोजी लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सदरचा अपघात हा 2014 मध्ये मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे झाला होता. कंटेनर चालक किसन लाल सिंग (वय 50 राहणार अजमेर राज्य राजस्थान) हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एच आर 61 बी 34 55 हा घेऊन गोवा ते अहमदाबाद असा चालला होता. मध्यधुंद अवस्थेत त्याने समोरून येणाऱ्या मॅजिक गाडी (नंबर एम एच झिरो ४ इएक्स 29 20) या गाडीला धडक दिली होती. या धडकेत मॅजिक गाडीतील प्रमोदिनी प्रमोद अडूरकर (वय 40 आणि दुर्वास प्रमोद आडुळकर (व 12) दोन्ही राहणार पालशेत गुहागर यांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. याप्रकरणी कंटेनर चालक किसन लालसिंग याच्यावर भादवी कलम 304 अ, 279, 337, 338, 427 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर या अपघात प्रकरणी लांजा न्यायालयात सुनावणी चालू होती. मात्र कोर्टाच्या तारखेला लालसिंग हा वारंवार गैरजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला अटक वाॅरंट काढला होता. यानुसार पोलीस निरीक्षक दादासाहेब गुड्डूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंखे, कॉन्स्टेबल गिरी गोसावी व हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे यांनी संबंधित कंटेनर चालकाची माहिती घेऊन राजस्थान अजमेर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी सर्वजण लांजा येथे दाखल झाले. आज मंगळवारी 27 जून रोजी त कंटेनर चालक किसन लाल सिंग याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांचा साधा कारावाच व सहा हजार रुपयाचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे