वीरधवल परब यांना व्यासंगी वाचक पुरस्कार

वेंगुर्ला | प्रतिनिधी– नगरवाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा व्यासंगी वाचक पुरस्कार यावर्षी साहित्यिक वीरधवल परब यांना जाहीर झाला असून २ जुलै रोजी सकाळी १० वाजता या पुरस्काराचे वितरण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते होणार आहे.
नगरवाचनालय या संस्थेकडे कै.श्रीराम मंत्री यांनी सुदत्त कल्याण निधीतर्फे देणगी दिलेली आहे. या देणगीतून स्वर्गीय सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. नगरवाचनालय संस्थेचा जो सभासद विविध वाङ्मयीन वाचन नियमित करतो अशा व्यक्तिला हा पुरस्कार देण्यात येतो.
फोटो – वीरधवल परब