दुचकीस्वारांवर आचरा ठाण्यात गून्हा दाखल
आचरा l प्रतिनिधी :वायंगणी तेथे आचरा मालवण रस्त्यावर हायस्कूल नजिक रस्त्याने पायी चालत जात असलेल्या चार पादचाऱ्यांना दुचकीस्वाराने मागुन जोरदार धडक दिल्याने पादचारी जखमी झालेत ही घटना मंगवारी रात्री ७.४५ सुमारास घडली. दिलेल्या फिर्यादीवरून आचरा पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार ऋषिकेश गुरुनाथ दुखंडे वय २१ रा वायंगणी दुखंडेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहतीनूसार फिर्याद देणाऱ्या सविता सदानंद राणे यांच्यासह राजु गवाणकर, पांडुरंग जोशी, दत्तराम सावंत हे एका कार्यक्रमातून कार्यक्रम आटपून आचरा मालवण रस्त्याने पाई चालत घरी जात असताना मागुन आलेल्या दुचाीस्वारांने जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर सर्वजण बाजूला फेकले गेलेत यात राजू गवाणकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर इतरांना किरकोळ दुखापती झाल्या. गंभीर जखमी गवाणकर यांना अधिक उपचरासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकीस्वार ऋषिकेश गुरुनाथ दुखंडे याच्यावर आचरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गद्शनाखाली बबन पडवळ करत आहेत.