एडमिशनची नवंसंकल्पना ‘मॉडेल करियर सेंटर ‘ तरुणांना रोजगारासाठी पुढचे अभिनव पाऊल

सावंतवाडी | प्रतिनिधी : सध्याच्या महागाईच्या दुनियेत तरुणांसाठी रोजगार हा खूप महत्वाचा झाला आहे. त्या दृष्टीने एडमिशनच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मॉडेल करियर सेंटर उभारले जाणार आहे. सिंधुदुर्गात शिकलेल्या मुलांना याठिकाणीच रोजगाराची माहिती व्हावी. त्यांना रोजगार मिळावा अशा हेतूने हे मॉडेल करियर सेंटर उभारले जाणार आहे.

तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आता जिल्ह्यात मॉडेल करियर सेंटर उभारलं जाणार आहे. सुप्रसिद्ध अशा एडमिशन मध्येच हे मॉडेल करियर सेंटर असणार आहे. त्यामुळे एडमिशन मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त मुंबईत अशा प्रकारचे मॉडेल करियर सेंटर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारची १८ केंद्र राज्यात उभारण्यात येतील असे जाहीर केले आहे.

लोकल इंडस्ट्रीज, हॉटेल, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, बीपीओ अशा ठिकाणी मुलांना याद्वारे जॉब मिळणार आहेत. बारावी, पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएट अशा सर्व शिकलेल्या मुलांसाठी मॉडेल करियर सेंटर उपलब्ध असणार आहे. मॉडेल करियर सेंटरच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. त्या ठिकाणी विविध कंपन्या आणि ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशाना बोलाविले जाईल. त्यातून कंपन्यांना योग्य उमेदवार आणि उमेदवारांना योग्य जॉब मिळेल.

मॉडेल करियर सेंटर अंतर्गत मुलांना स्वयंरोजगार करायचा असेल तर बँक कर्जाची देखील माहिती मिळेल, उद्योग कसा उभारायचा याचे देखील प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये फार विश्वासार्हता जपली जाणार असून

याची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. जी मुले शिकून बाहेर पडतात त्यांच्या कलानुसार मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याप्रमाणे मुलांना रोजगार उपलब्ध करून देणे हे या मॉडेल करियर सेंटरचे काम असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Sindhudurg