1 जुलै ते 7 जुलै पर्यंत कृषी दिनानिमित्त कल्पवृक्ष सप्ताहाचे आयोजन – नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन शिबीर 

 

रत्नागिरी | प्रतिनिधी :स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 2015 पासून नारळ झाडाचे व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करत आहे. नारळ पाडपी न मिळणे, रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीची लागण, गेंड्या भुंग्याचे आक्रमण यामुळे नारळ बागायतदार त्रस्त झाले आहेत. हतबल झाले आहेत. विविध समस्यांच्या व्यवस्थापनासाठी येणारा खर्च सुरुवातीला उत्पन्नापेक्षा जास्त होतो म्हणून अनेक जण *परमेश्वर म्हणून पुजल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडाकडेच लक्षच देत नाहीत.*

 

नारळ झाडाच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका, योग्य नियोजनासाठी स्वराज्य ॲग्रो अँड अलाईड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत कल्पवृक्ष सप्ताहाच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सकाळी 10:00 ते दुपारी 12:00 या वेळेत २०३, श्रम साफल्य, मनीषा टायपींग सेंटरच्या वर दुसरा मजला, खालची आळी, रत्नागिरी येथे आयोजित केले आहे. नारळ झाड मालकांनी शिबिरात येताना नारळाच्या झाडांचे झावळी जवळचे व बुंधा जवळचे मोबाईल मध्ये फोटो काढून आणावे.

नारळ झाड मालकांनी या कल्पवृक्ष सप्ताहात सामिल व्हावे असे कंपनीमार्फत आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9607 192 912, 8080 188 218