४३० प्रवाशानी अनुभवला पहिला प्रवास
खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावर बुधवारी धावलेल्या २२२२९ क्रमांकाच्या सीएसएमटी मुंबई- मडगाव सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसने पहिल्याच फेरीत ६ लाख ४८ हजार रुपयांची कमाई केल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले.
वंदे भारत एक्सप्रेसच्या ५३० आसन क्षमतेपैकी ४७७ जागा आरक्षित होऊन वंदे भारत एक्सप्रेस ९० टक्के भरली. याशिवाय गणेशोत्सवातील १५ ते २० सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीसाठीचे ११० टक्के आगाऊ आरक्षण झाल्याचेही स्पष्ट केले .
कोकण मार्गावर बुधवारी प्रथमच।धावलेल्या सुपरफास्ट सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत
एक्सप्रेसच्या पहिल्याच फेरीत ४३० प्रवाशांनी सफर करत पहिल्या प्रवासाचा आनंद लुटला. वंदे भारत एक्सप्रेसमधून रत्नागिरी स्थानकापर्यंत सर्वाधिक १४३ जणांनी, त्याखालोखाल १०५ प्रवाशांनी मडगावपर्यंत प्रवास केला. खेडमधील ४७ जणांनी ‘वंदे भारत’मधून पहिल्या प्रवासाला पसंती दिल्याची माहिती
उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे मंगळवारी मडगाव- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण
केल्यानंतर बुधवारपासून कोकण मार्गावर नियमितपणे धावण्यासाठी।सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सज्ज झाली.
लोकार्पणानंतर धावलेल्या मडगाव- सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधून निमंत्रितांनीच पहिल्या प्रवासाचा आनंद लुटला.यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून
आले. कोकण मार्गावरून प्रथमच धावलेल्या २२२२९ क्रमांकाच्या सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीवेळी अधिकृत प्रवाशी
तक्त्यानुसार सर्वाधिक १४३. प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रवास करत अव्वलस्थानी राहिले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या चेअर कार डब्यातून १४१ तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून २ प्रवाशांनी पहिला प्रवासाचा अनुभव घेतला.
या खालोखाल मडगावपर्यंत ९२ प्रवाशांनी चेअर कारमधून तर १९ जणांनी एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून अशा १०५ प्रवाशांनी मडगावपर्यंत पहिला
प्रवास केला. खेड स्थानकापर्यंत ४१ जणांनी चेअर कारमधून तर ६ जणांनी एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून प्रवास करत पहिल्या प्रवासाचा आनंद लुटला.