आमदार नितेश राणे यांचा राऊत, ठाकरेंवर हल्लाबोल
कणकवली : सामनातून आपला तो बाब्या आणि तुमचा तो कार्ट अशा पद्धतीचे वाक्य वापरले गेले असून त्याला आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर देखील दिलंय. हे नियम हे वाक्य संजय राजाराम राऊतने आम्हाला न सांगता स्वतःच्या मालकाला सांगावं, जो नियम त्याच्या स्वतःच्या कार्ट्याला लावतो. तोच नियम त्यांनी अन्याय शिवसैनिकाला कधीच लावलेला नाही. महाविकास आघाडीची सत्ता असताना तुझा मालक मुख्यमंत्री असताना संजय राठोड ना एका महिलेच्या घटनेवरून त्यांना राजीनामा द्यायला लावला, आता तोच नियम आणि तोच आरोप आदित्य ठाकरे वर पण झालेला आहे. आदित्य ठाकरे वरपण दिशा सलियानच्या हत्येचा आरोप आहे. तोच नियम आदित्य ठाकरेला का लावला नाही लावला ? तिथे समान नागरी कायदा का आणला नाही ? असा सवालही आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांना केला आहे.
दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा संजय राजाराम राऊतने हा सल्ला पहिला आपल्या मालकाला द्यावा. त्याचा जो कार्टा आहे त्याचच नाव जे दिशा सालियान च्या प्रकरणांमध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री असताना पहिला त्याच्या कारट्याचा राजीनामा घेतला असता तर मग त्यांना लोकांचा राजीनामा घेण्याचा अधिकार असता. समान नागरी कायद्यावर ठोस भूमिका घेण्यायएवढी उद्धव ठाकरेमध्ये हिम्मत नाही. बाळासाहेबांच्या या सेना भवनला हिंदुत्वाच्या मंदिर म्हणून प्रत्येक जण ओळखतो.तेच सेना भवन आज हिंदुत्वाच केंद्रबिंदू म्हणून राहिलेल नाही. सेना भवनात उद्धव ठाकरेला भेटायला मुस्लिम लोक आले. त्यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, संजय राजाराम राऊत आणि अन्य उद्धव ठाकरे यांच्या सैनिकांना व विचारायचं आहे की तुम्ही बाळासाहेबांना आपले बाळासाहेब म्हणता या सेना भवन मध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या विचाराची शिवसेना उभी केली. तिथे मुस्लिम लोक यायला लागले तर सेना भवनमध्ये गोमूत्र शिंपडणार का ? सेना भवनचे शुद्धीकरण करणार का ? जर जमत नसेल तर सेना भवन वरील बाळासाहेबांचा फोटो काढून तिथे भोंगा लावा. मग पहा रोज सायंकाळी काय तिथे सुरू होत ते अशा शब्दात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कानउघाडणी देखील आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
समान नागरी कायदा याबद्दल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी समर्थन केलं. तुम्ही खरचं जर त्यांच्या विचारावर खऱ्या अर्थाने चालला असाल जर खरचं बाळासाहेबांचं रक्त असेल तर समान नागरी कायद्याला समर्थन करून दाखवा. उगाच मुस्लिम लीगची भाषा करून बसू नका. भिवंडीचे उदाहरण देण्यापेक्षा तुझ्या मालकाला सांग पहिला तुझ्या शिवसेनेमध्ये पहिला समान नागरी कायदा लागू कर आणि मग मुलाला एक न्याय आणि अन्य शिवसैनिकांना एक न्याय हे पहिल्यापासून तुझ्या मालकाच धोरण राहिलेला आहे.
आदित्य ठाकरेच्या गाडीबरोबर जो एका मोटारसायकलचा अपघात झाला तो संशयास्पद अपघात असल्याचा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे ची गाडी आणि बाईक यात अपघात झाला नाही तर ती घटना घडवली गेली आहे. ती घटना घडवणे म्हणजे स्वतःची सुरक्षा वाढवणे. मातोश्रीच्या अवतीभवतीच्या काढलेल्या सुरक्षेच्यामुळे त्यांची झोप उडालेली आहे. किती डॉक्टर छाती तपासायला येतात याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे. मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी करावी उगाच कोणालाही टार्गेट करण्याअगोदर या ४२० लोकांच काय त्याच्यामध्ये याला संरक्षण वाढवायचाय. यांना भीती आहे तर कोणी तिथे चपला मारतील आणि म्हणून हा सेना भवन च्या बाहेरचा बाईचा रचलेला कट आहे.
संजय राऊत केव्हापासून हे सरकार बनले तेव्हापासून थापा मारत आहेत. हे सरकार जाणार जाणार म्हणून. अनेक वेळा महिने सांगितले मात्र अधिक वेगाने हे सरकार चालले आहे. मात्र आता तुझी आत जाण्याची वेळ आलेली आहे. तुझ्यात हिंमत असेल तर पत्राचाल मध्ये जा आणि मागे येऊन दाखव, असा इशारा देखील आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे. कारण पत्राचाल चा निकाल कधीही लागेल. तू भांडुओ मध्ये औटघटकेचा राहिलेला नाही. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी भांडुप मध्ये बसून करण्यापेक्षा तुझ्या मध्ये हिम्मत असेल आणि खरोखरच राजाराम राऊतचा मुलगा असशील तर जाऊन पहिला तिथे उभा दाखव. मगच भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोल. मात्र एक लक्षात ठेव देवेंद्र फडणवीसांनी तुझ्यात मालकासकट सगळ्यांची झोप उडवलेली आहे.