गुगल मॅपचा घोळ चिवला बीच वर येणारा पर्यटक जातो दांडी बीचवर

Google search engine
Google search engine

चिवला बीच येथील पर्यटन व्यावसायिकांचे पोलिसांना निवेदन : सायबर क्राईम अंतर्गत चौकशीची मागणी

मालवण : गुगल मॅपवर ‘चिवला बीच’ असे टाइप केल्यानंतर मॅप सेट करून येणारा पर्यटक प्रत्यक्षात दांडी बीचवर पोहोचतो. वारंवार घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर चिवला बीच येथील चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन विविध सेवा सहकारी संस्था यांच्या वतीने पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

A tourist who comes to Chiwala beach goes to Dandi beach due to confusion of Google map

गुगल मॅप लोकेशनमध्ये कोणी चुकीच्या पद्धतीने बदल केला असेल तर सायबर क्राईम अंतर्गत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी विशाल गोवेकर, शेखर खोर्जे, गणेश मसुरकर, विनोद वेंगुर्लेकर, भूषण कासवकर, रोहित मेथर, सचिन गोवेकर, हर्षराज शिर्सेकर, पिंटो रोड्रिंक्स, फ्रान्सिस फर्नांडिस, मनोज मेथर, स्वीटन सोज आदी उपस्थित होते.

मालवण तालुक्यातील सर्वात सुंदर व स्वच्छ किनारा म्हणून पर्यटकांची सर्वाधिक पसंती चिवला बीचला असते. मोठ्या संख्येने देशी विदेशी पर्यटक याठिकाणी येत असतात. बाहेरून येणारे पर्यटक हे गुगल मॅप आधारे चिवला बीचला येतात. मात्र काहीवेळा मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षात ते दांडी बीचवर पोहचतात. त्यामुळे पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. ज्यांनी पहिल्यांदाच आपल्या मोबाईलमध्ये गुगल मॅपवर चिवला बीच सर्च केले आहे, त्यांच्याबाबत असा प्रकार घडल्याचे पर्यटकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे समोर आले आहे. तरी लोकेशनमध्ये कोणी बदल केला असेल तर सायबर क्राईम अंतर्गत चौकशी करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.