आजगाव, गेळे, नेतर्डे व तांबुळीत एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध
तर सदस्य पदांसाठी ९१० उमेदवारी अर्ज
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या ५२ ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९३ तर सदस्य पदासाठी ९१० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजगाव, गेळे, नेतर्डे, तांबुळी येथून सरपंच पदासाठी केवळ १ अर्ज आल्यानं सरपंच निवड बिनविरोध होणार आहे. तर सरपंच पदासाठी सातोसे मधून ९ न्हावेलीतून ८ डेगवे ७, चराठे, सातार्डा, सोनुर्ली, तळवणे, वेर्ले, विलवडेतून ६ असे सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
आगामी १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज अर्ज सादर करायच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी करीत नामनिर्देशन पत्रे सादर केली. या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तर मतदान १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत व मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात ५२ ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९३ तर ९१० जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल केली आहेत. या निवडणुकीत आजगाव, आंबेगाव, असनिये, बांदा, भालावल, भोमवाडी, चराठे, डेगवे, देवसू दाणोली, धाकोरे, गेळे, गुळदूवे, कलंबिस्त, कारीवडे, कास, कवठणी, केसरी फणसवडे, किनळे, कोनशी दाभीळ, कुडतरकरटेंब सावरवाड, कुणकेरी, माडखोल, मडुरा, माजगाव, नाणोस, नेमळे, नेतर्डे, न्हावेली, निगुडे, निरवडे, ओटवणे, ओवळीये, पाडलोस, पडवे-माजगाव, पारपोली, रोणापाल, सांगेली, सरमळे, सातार्डा, साटेली तर्फ सातार्डा, सातोसे, सातुळी बावळाट, शेर्ले, शिरशिंगे, सोनुर्ली, तळवणे, तांबुळी, तिरोडा, वाफोली, वेर्ले, वेत्ये, विलवडे या ५२ ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत.
Sindhudurg