आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी आरवली येथे श्री. वेतोबाच्या मूर्तीमध्ये घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन

वेंगुर्ले : प्रतिनिधी

आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा मंदिरात भजनी सप्ताह सुरू असून आज आषाढी एकादशी निमित्त श्रींची मूर्ती विठ्ठलाच्या रूपात सजवण्यात आली होती. त्यामुळे अनेक भक्तांनी भजनी सप्ताहात श्री. वेतोबाच्या मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.
आरवली येथील वेतोबा मंदिरामध्ये सप्ताह निमित्त सातही दिवस श्रींची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. या सात दिवसात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. सप्ताहात आज आषाढी एकादशीचा योग असल्याने श्री. वेतोबाला श्री विठ्ठलाच्या रूपात दाखविण्यात आले. त्यामुळे पंढरपुरात जाऊ न शकणाऱ्या भाविकांनी आरवली मध्ये येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.