गुहागर | प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सरचिटणीस वैभव खेडेकर ,जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण , गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांची उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाली असून उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे मनसे अध्यक्ष शिवतीर्थ बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.
यावेळी बोलताना विनोद जानवळकर म्हणाले की, राज साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मी मनसे पक्षात आलो, पक्षाने मला पहिली ३वर्षे उप तालुका अध्यक्ष, त्यानंतर ४ वर्षे तालुका अध्यक्ष पद दिले, जनहिताची कामे मी सतत करत होतो, जनतेच्या न्याया साठी सतत लढत राहिलो, नागरिकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहिलो. आज माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिलीआहे. मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही व त्यांना अपेक्षित असलेले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.