महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या महेश विचारे यांना प्रदान

रत्नागिरी : येथील सामाजिक कार्यकर्त्या व उमेद अंतर्गत महिला बचतगटाच्या सीआरपी ऐश्वर्या विचारे यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांचा आज फणसोप ग्रामपंचायत यांच्यावतीने सरपंच सौ. राधिका साळवी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

ऐश्वर्या महेश विचारे या अनुलोम या सामाजिक संस्थेच्या स्थानमित्र असून या संस्थेच्या माध्यमातून सरकारी योजना लाभार्थी यांना मिळवून देणे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.तसेच त्या उमेदच्या महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रोजगार विषयक प्रशिक्षण देण्यासाठी नेहमीच सक्रिय आहेत.सागरी सीमा मंचच्या माध्यमातून स्वच्छता अभियान व किनारपट्टीवरील निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सक्रिय सहभाग असतो.

महाराष्ट्र शासनाने यावर्षीचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. ग्रामपंचायत हद्दीत सामाजिक काम करण्याऱ्या महिलांचा सन्मान करता यावा यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या महेश विचारे यांना मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.