माखजन हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली आषाढी एकादशी

गुरुकुल पूरक उपक्रम

माखजन |वार्ताहर :    संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथील गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी नजिक च्या बुरंबाड गावातील श्री देव विष्णू मंदिरात आषाढी एकादशी साजरी केली.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेश परिधान करून समूहिक भजन सादर केली.शिवाय विठू नामाचा जय घोष करत फेर धरला.लहान लहान मुलांचं हे कौतुक पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थ जमले होते.या वेळी संस्थेचे आनंद साठे,गुरुकुल पूरक उपक्रमाचे प्रमुख सचिन साठे,संगीत शिक्षक विशारद गुरव आदी उपस्थित होते.