मंडणगड | प्रतिनिधी : ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी विध्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून दिंडीची सुरुवात ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कूल पासून ते एस.टी. स्टॅंड परिसर भागात आयोजित करण्यात आली. विठूमाऊलींचा गजर करीत पूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष चारुलता पारेख, मर्चंडे मॅडम, स्वामी मॅडम, खांबे मॅडम, व्हावे मॅडम, पंदिरकर मॅडम, अर्जुन भोसले, मिलींद लोखंडे, विनोद जाधव उपस्थित होते.