रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; गडमठ येथील घटना 

वैभववाडी | प्रतिनिधी
रेल्वेच्या धडकेत गडमठ मोहीतेवाडी येथील प्रवीण राजाराम मोहीते वय ४८ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वा. सुमारास गडमठ गावठाणवाडीनजीक असलेल्या रेल्वे रुळावर घडली. अपघाताची खबर सहदेव बाळकृष्ण मोहीते यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत दिली आहे.
मयत सहदेव मोहीते हा मनोरुग्ण होता. तो गावात इकडेतिकडे फिरत असे. असाच तो शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता. दरम्यान ९.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तो जागीच गतप्राण झाला. माञ कोणत्या ट्रेनची धडक बसली हे समजू शकले नाही. ही माहीती मिळताच वैभववाडी पोलिस उपनिरीक्षक रोहीत खोत, पोलिस राहुल पवार, अजय बीलपे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस हवालदार शैलेद्र कांबळे करीत आहेत.