रत्नागिरीचे माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची बदली

रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरीचे माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची बीड येथे बदली झाली आहे. तसे आदेश आज शासनाने दिले आहेत.

सुमारे साडेचार वर्ष प्रशांत दैठणकर हे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. कोरोना काळात त्यांनी स्वतः आजारी असतानाही शासनाची बाजू जनतेसमोर आणण्यासाठी उत्तम माहिती उपलब्ध करून दिली होती. शासन आणि रत्नागिरीतील माध्यमे यांचे ते उत्तम दुवा झाले होते. स्वतः उत्तम लेखक असलेले प्रशांत दैठणकर यांची बीड येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पणजी गोवा येथील वरिष्ठ सहाय्यक संचाक (माहिती) प्रशांत सातपुते हे रत्नागिरीचे माहिती अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.