वेंगुर्ला | प्रतिनिधी– सध्यस्थितीत जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसकडून ग्रामपंचायत तुळसच्या सहकार्याने सलग २२ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरासाठी सावंतवाडा उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला सहयोगी संस्था आहेत. लाईफ टाईम हॉस्पिटल,पडवे रक्तपेढीच्या सहकार्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त रक्तदात्यानी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन केले आहे. नाव नोंदणीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संफ साधावा.