खालची तळाशील वासियांचे शिक्षकांसाठी चे आंदोलन स्थगित
गटशिक्षणाधिकारी यांची यशस्वी मध्यस्थी
आचरा | अर्जुन बापर्डेकर : मालवण गटशिक्षणाधिकारी माने यांनी
पुर्ण प्राथमिक शाळा तोडवळी खालची शाळेला महिन्या भरात शिक्षक उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासनानंतर तोंडवळी खालची तळाशीलवासियांनी उपोषण आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहिर करत मुलांना शाळेत पाठविले.
त्यामुळे शनिवार पासून शाळा पुन्हा गजबजली
मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची शाळेत दोन शिक्षक पदे रिक्त असून तात्काळ दोन शिक्षक उपलब्ध करुन द्यावेत यासाठी पालकांनी शनिवार 24जून पासून मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. येवढे करुनही शिक्षक मिळाला नसल्याने संतप्त पालकांनी येत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शाळेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गटशिक्षणाधिकारी माने यांनी शुक्रवारी तोंडवळी खालची शाळेला भेट देवून येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, मुख्याध्यापिका श्रीमती खडपकर,शाळा व्यवस्थापन समितीचे जितेंद्र तोडणेकर,सुरेंद्र मालंडकर यांसह अन्य ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी माने यांनी येत्या महिन्या भरात तोंडवळी खालची शाळेला एकूण मुख्याध्यापकांसह अन्य चार शिक्षक उपलब्ध करून देण्याचे तसेच या शाळेचे शिक्षक कामगिरीवर न पाठविण्याबाबत शब्द दिल्याचे तळाशिल ग्रामस्थांनी सांगितले.यामुळे पालकांच्या मागण्या मान्य झाल्याने येत्या महिनाभरासाठी आंदोलन स्थगित करत असल्याचे पालकांकडून स्पष्ट करण्यात आले. महिनभरात शिक्षक न मिळाल्यास पंधरा ऑगस्ट ला शाळेसमोर काळीफित लावून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.