जालगाव येथे टेम्पोचा अपघात एक गंभीर; तीन जखमी

दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील जालगाव येथे मालवाहू गाडी पलटून झालेल्या अपघातात तीनजण किरकोळ जखमी झाले तर एकजण गंभीर जखमी आहे. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दापोलीकडून दाभोळकडे सदर टेम्पो जात होता. या अपघातातील सर्व जखमींना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. जखमींमधील एक माटवण गावातील असून बाकी तिघेजण वडवली गावातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी यावेळी मदत केली. या अपघाताचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.