दापोली | प्रतिनिधी :- आज शनिवारी सकाळी ७.३० मि. ला सुटणा-या बस क्र MH 09 FL1038 दापोली ठाणे या शिवशाही एसटी बसला लाटवण येथे अपघात झाला. एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून इतर सर्व सुखरूप आहेत .सर्व प्रवाशांना दुस-या गाडीने पुढील प्रवासाला रवाना केल्याची माहिती दापोली आगार च्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.