महामार्गाच्या बाजूला झाडे लावण्याचा उपक्रमास प्रारंभ

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाट ते आरवली या दरम्यानच्या रस्त्यानजीक विविध प्रकारची झाडे लावण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते तसेच पोलीस अधीक्षक कुलकर्णी, प्रांत अधिकारी आकाश निगडे तहसीलदार लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते झाला

मुंबई गोवा महामार्गावर बाजूला मोकळ्या जागेमध्ये परशुराम घाट ते आरवली दरम्यानच्या ३७ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये झाडे लावण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. यासाठी आमदार शेखर निकम यांनी एक बैठकही घेतली होती. या बैठकीला काही सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते व कृषी विषयातले तज्ञ तसेच लोकप्रतिनिधी सरपंच, ग्रामसेवक . तलाठी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. याशिवाय मुंबई गोवा महामार्गाच्या काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी झाडे लावण्यासंदर्भातले नियोजनही करण्यात आले होते. सुमारे वीस हजार झाडे लावण्याचा प्रारंभी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी सावर्डे येथे पॅसिफिक हॉटेल शेजारी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी आमदार शेखर निकम पोलीस अधीक्षक कुलकर्णी तसेच प्रांताधिकारी आकाश निगडे यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली यावेळी महामार्गाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता आर.के.कुलकर्णी तसेच स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय चेतक कंपनीचे मुख्य अधिकारी जयंती नानेचचा व ईगल कंपनीचेही अधिकारी उपस्थित होते.तसेच हेल्प फौंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई मुकादम सावर्डेचे पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. महामार्गानजिक महिनाभरामध्ये सुमारे वीस हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे.