भटवाडी लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील तो धोकादायक दगड हटवला

सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी शहरातील भटवाडी येथे लक्ष्मीनारायण मंदिरच्या समोरील रस्त्याच्या मधोमध कित्येक दिवसापासून असलेला दगड व मातीचा उंच ढिगारा अपघाताला कारणीभूत ठरत होता. अखेर सामाजिक बांधिलकीच्यावतीने तो दगड व माती बाजूला करून सपाटीकरण करण्यात आले.

भटवाडी येथील सदर जागेवर मधोमध असलेल्या त्या ढिगार्‍यावर अनेक जण मोटरसायकल चढवून अपघातग्रस्त होता होता वाचले होते. अखेर सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्याम हळदणकर व रवी जाधव यांनी पुढाकार घेऊन तो दगड व मातीयुक्त तो ढिगारा पूर्णतः बाजूला करून रस्ता मोकळा केला व पुढे होणारा अनर्थ टाळून जनसेवेच एक चांगलं उदाहरण लोकांसमोर समोर ठेवलं. त्यांच्या या जनसेवेच तेथील रहिवाशांकडून कौतुक होत होतं.

Sindhudurg