वेरळ येथील श्री साई बाबा मंदिरात सोमवारी ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

लांजा (प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावर वेरळ गावी उभारण्यात आलेल्या श्री साई बाबा मंदिरात सोमवारी ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही वेरळ येथील श्री साई बाबा मंदिरात सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सकाळ पासून विधिवत पुजा -अर्चा ,अभिषेक ,दुपारी १२ वाजता माध्यान आरती व त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी साईभक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.