कर्तव्यदक्ष व निष्कलंक सेवा कार्याचा गौरव

मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांचा सेवानिवृत्त सन्मान सोहळा ठरला लक्षवेधी

मालवण | प्रतिनिधी : पुष्पवृष्टी, शुभेच्छांचा वर्षाव, विविध मान्यवरांचे कौतुकोद्गार अश्या सन्मान सोहळ्याने मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांचा सेवानिवृत्ती पर निरोप समारंभ संपन्न झाला. उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी विजय यादव यांच्या ३९ वर्षाच्या कर्तव्यदक्ष व निष्कलंक सेवा कार्याचा गौरव केला.

मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, सौ. श्वेता विजय यादव, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस निरीक्षक बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, उत्तम आंबेरकर, श्री. वारंग, तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, कोकण विभागीय सचिव जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, दीपक पाटकर, राजा गांवकर, विनय गांवकर, जॉन नरोना, भाऊ सापळे, बाबू बिरमोळे, ललित चव्हाण, निवेदक विनोद सातार्डेकर यांसह व्यापारी, सामाजिक संस्था पदाधिकारी तसेच पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, भगवान खोत, विलास टेंभुलकर, हेमंत पेडणेकर, प्रमोद नाईक, सुभाष शिवगण, प्रकाश मोरे, राजन पाटील, गुरुप्रसाद परब, धोंडू जानकर, सुहास पांचाळ, सुशांत पवार, सुप्रिया पवार, कैलास ढोले, अजय येरम, वृषाली पाटील, विश्वास पाटील, संदेश करंगुट कर, विवेक फरांदे, प्रतीक जाधव, श्रीकृष्ण भोसले, सिद्धेश चीपकर, प्रसाद आचरेकर, संदीप सरकुंडे, देवेंद्र लुडबे, अमित हरमलकर, गंगाबाई येडगे, नमिता आरोसकर, निशिगंधा पवार, प्रवीण आचरेकर, शिल्पा धामापूरकर, संतोष नांदोस्कर, भक्ती शिवलकर, संकेत तांडेल, होमगार्ड, पोलीस पाटील उपस्थित होते.
सुरवातीला मालवण पोलीस ठाणे येथे विजय यादव यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर कार्यक्रमस्थळी श्री व सौ. यादव यांच्यावर सर्व उपस्थितांनी पुष्पवृष्टी केली. अनोख्या पद्धतीच्या या आनंद सोहळ्याने यादव दाम्पत्य भारावून गेले.पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी विजय यादव यांच्या चांगल्या कामाचे विशेष कौतुक केले. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगितले, मागील २५ वर्षात कोणत्याही अधिकाऱ्याला अश्या प्रकारे सर्वांचे प्रेम बघितले नाही. असे ते म्हणाले. यासह पत्रकार नंदकिशोर महाजन, पोलीस अधिकारी कोल्हे, बगळे, बंगडे, आंबेरकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

माझे कुटुंब भारावले ; श्वेता यादव

सर्वांचे प्रेम, कौतुक, शुभेच्छा यांनी माझे कुटुंब भारावून गेले आहे. असे सौ. श्वेता यादव म्हणाल्या. उपस्थितांची गर्दी व सर्व स्तरातील शुभेच्छा ही त्यांची पुण्याई आहे. त्यांनी मिळवलेले प्रेम आहे. माझे यजमान यांचा बहुतांश सेवकाळ अन्य जिल्ह्यात सेवा बजावत गेला. मात्र कुटुंबाकडे त्यांचे नेहमीच लक्ष राहिले. मी शिक्षकी पेशा जबाबदारी सांभाळून कुटुंबाची, मुलांची व त्यांच्या शिक्षणाची ही जबाबदारी खंबीरपणे सांभाळणार हा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे सर्व शक्य झाले. मुले शैक्षणिक प्रगती साध्य करत यश मिळवत आहेत. मात्र पती अन्य ठिकाणी सेवेत आहेत याची आठवण सतत येत राहिली. असे सांगत श्वेता यादव सादर केलेली कविता ऐकून सर्वांचे डोळे पाणावले.

सर्वांची साथ मोलाची ठरली : विजय यादव

पोलीस दलातील माझ्या सेवाकाळात कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही याची काळजी घेत सेवा बजावली. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभले. अधिकारी, कर्मचारी यांची साथ व मालवण वासीयांचे प्रेम मोलाचे राहिले. असे सांगत पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी सर्वांप्रती आदर व्यक्त केला.