आचरा | अर्जुन बापर्डेकर : दहावी बारावी परीक्षेत सिंधुदुर्ग अव्वल येत आहे. स्पर्धा परीक्षेतही हे यश मिळवून एमपीएससी, युपीएससीत जिल्ह्याचा टक्का वाढविण्यासाठी या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा चे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी केले.
जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत सल्लागार बाबाजी भिसळे,सचिव जे एम फर्नांडिस,मनाली फाटक,सुरेश ठाकूर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आचरा केंद्रातून दहावी बारावी तसेचमराठी,इंग्रजी विषयात अव्वल आलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.