सिंधुदूर्ग जिल्ह्यात कॅबिनेट बैठक घेण्याची मागणी – राजन तेली

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

जिल्ह्यात विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे सी-वर्ल्ड व एमआयडीसी सारखे प्रकल्प मार्गी लागावे, यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात “कॅबिनेट” ची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ही बैठक झाल्यास मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याबरोबर रेंगाळलेले अनेक प्रकल्प निश्चितच मार्गी लागतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

सावंतवाडी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बाजूला संजू परब, महेश सारंग, मनोज नाईक, अजय गोंदावळे, रवि मडगावकर, एकनाथ नाडकर्णी आदी उपस्थित होते.

Sindhudurg