युवा नेते अबिद नाईक यांचा पुढाकार ; कणकवलीत जोरदार घोषणाबाजी
कणकवली : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर कणकवली राष्ट्रवादी नेते अबिद नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांकडून फटाके वाजवून कणकवली येथे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी अजित दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवार यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यासह ९ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. त्यानंतर कणकवली राष्ट्रवादीच्या माध्यमातून फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी मिठाई वाटण्यात आली.