आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये भारताला पाच सुवर्णपदक घेत ठरले आंतरराष्ट्रीय ट्रॉफी चे मानकरी.

 

चिपळूण : महाराष्ट्र राज्य डान्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमधून अव्वल कामगिरी दाखवून या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली होती. तर 3री माउंट एवरेस्ट आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स ही स्पर्धा दिनांक 26 ते 27 जून रोजी नेपाळ काठमांडू येथे त्रिभुवन युनिव्हर्सिटी मध्ये पार पडली या स्पर्धेमध्ये लोणावळा येथील आठ वर्षाखालील सावी अंभुरे सुवर्णपदक तर पंधरा ते सतरा वयोगटांमध्ये सोहम मलिक सुवर्णपदक डुएट ओपन कॅटेगरीमध्ये श्लोक तावडे व तनुज मेहता सुवर्णपदक तर 19 वर्षावरील मुलींमध्ये निकिता स्वामी सुवर्णपदक या सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत भारताच्या इतिहासात आणखी एक भर टाकत आपली अवल कामगिरी दाखवून दिली. विविध देशातून आलेल्या 208 स्पर्धकांमध्ये ही लढत झाली असताना महाराष्ट्र राज्याचे हे विद्यार्थ्यांनी आपल्या भारताचे नाव उंच स्तरावर नेऊन ठेवलेले आहे या स्पर्धेकरिता राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चे अध्यक्ष श्री रजनीकांत ठाकूर सर तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व भारतीय संघाचे कर्णधार श्री सुरज जाधव सर व पुणे जिल्ह्याचे सेक्रेटरी राज चव्हाण सर यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले तसेच या स्पर्धेकरिता नृत्य दिग्दर्शक म्हणून लोणावळा येथील सुरज सरावते यांनी सर्व विद्यार्थ्यांना कोरिओग्राफ केले. सर्व विजेते खेळाडूंना राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स सेक्रेटरी रजनीकांत ठाकूर सर व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरज जाधव सर ह्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इंडो भूटान या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.