राजापूर (वार्ताहर): सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई या संस्थेच्या वतीने दरवर्षी दहावी उत्तीर्ण व पुढील शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन संस्थेचे चिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई या संस्थेच्या वतीने दरवर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व दहावी उत्तीर्ण होवून सरकारमान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असलेल्या गरजू पण होतकरू विद्यार्थी विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात येते.
यासाठी जाती धर्माची बंधने नाही, तसेच विशिष्ट गुणांची अट नाही. सन 2023-24 या वर्षाकरिता जे विद्यार्थी इच्छुक आहेत. अशांनी संस्थेच्या www.subhadrabaishikshannidhi.com या संकेत स्थळावरील माहितीपत्रक पाहावे व आपले अर्ज दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत ई मेलवर ऑन लाईन पध्दतीने भरावेत असे आवाहन संस्थेच्या वतीने चिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे