वायंगवडे येथील बंद बीएसएनएल टॉवर प्रश्नी ग्राहक त्रस्त

 

सरपंच विशाखा सकपाळ यांनी भाजप जिल्हासरचिटणीस अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना विचारला जाब ; तात्काळ टॉवर दुरुस्त करण्याची मागणी

मालवण | प्रतिनिधी : वायंगवडे येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत आहे. संपर्क यंत्रणा इंटरनेट सेवा ठप्प होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी टॉवरची योग्य ती दुरुस्ती तात्काळ करून ग्राहकांना सेवा द्या. अशी आक्रमक भूमिका वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ यांनी मांडली.

भाजप जिल्हासरचिटणीस अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरपंच विशाखा सकपाळ, विजय सकपाळ ग्रामस्थांनी मालवण बीएसएनएल कार्यालय येथे धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. बॅटरी व अन्य प्रश्न तात्काळ सोडवून बंद टॉवर तात्काळ सुरू करा अशी भूमिका मांडली.

दरम्यान काही साहित्य उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली. मात्र टॉवर दुरुस्ती लवकरात लवकर करून सेवा सुरळीत केली जाईल असे बीएसएनएल अधिकारी यांनी सांगितले.

फोटो ; वायंगवडे येथील बंद बीएसएनएल टॉवर प्रश्नी सरपंच विशाखा सकपाळ यांनी भाजप जिल्हासरचिटणीस अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना विचारला जाब विचारला. (अमित खोत, मालवण)