कलमठ ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
कणकवली : कलमठ गावचे वरीष्ठ वायरमन शिवाजी ईश्वर मोहिते यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी कलमठ ग्रामस्थांनी वीज वितरण चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.श्री.शिवाजी ईश्वर मोहिते हे वरीष्ठ वायरमन म्हणुन गेली ४ वर्षे कार्यरत आहेत. कलमठ गावच्या व परिसरातील नागरी वस्तीमध्ये अत्यंत प्रमाणिकपणे काम करीत आहेत. कलमठ मधील वाढते शहरीकरणामुळे वारंवार होणा-या अडचणीकरिता श्री.मोहिते हे अनुभवी कर्मचारी असल्याने त्यांची बदली झाल्यास मोठया प्रमाणा समस्या निर्माण होवु शकतात.त्यामुळे त्यांची बदली करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली.यावेळी सरपंच संदिप मेस्त्री,उप सरपंच स्वप्नील चिंदरकर,महेश लाड, पप्पू यादव, मिलिंद चिदरकर, बापु नारकर,विघ्नेश गोठणकर,आबा कोरगावकर,प्रमेश चिंदरकर,निखिल कुडाळकर ,सचेंद्र जाधव,परेश कांबळी, जितेंद्र कांबळी,नितिन ग. पवार आदी उपस्थित होते.