खेड | प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसापासून आभाळ फाटल्यागत कोसळत असलेल्या पावसाने सोमवारी दिवसभर कहरच केला दुपारनंतर पावसाने मुसळधार सुरुवात केल्याने नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडून वाहत होती
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यासह शहराला पावसाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे यामुळे जगबुडी व चोरद या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे सोमवारी जगबुडी नदीने सायंकाळी सात वाजन्याच्या सुमारास इशारा पातळी ओलांडून धोक्याची पातळी गाठली नदीपात्रातील पाणी ६.४० मीटर वर पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा सुचना देण्यात आल्या आहेत.