आजगाव हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गुणगौरव

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. इयत्ता दहावीचा निकाल ९६ .१५ टक्के लागला असून प्रथम क्रमांक काजल सुनील मुळीक ९१.६० टक्के, द्वितीय क्रमांक वैष्णवी ईश्वर थडके ८७.६० टक्के, तृतीय क्रमांक विराज अनंत प्रभू साळगावकर ८७ टक्के यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. ग्रामपंचायत मार्फत शाळेतील सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री उत्तम भागीत यांनी केले. शाळा समिती अध्यक्ष श्री अण्णा झांट्ये, आजगाव सरपंच सौ.यशश्री सौदागर,मनिषा गोवेकर, ग्रामसेवक श्री गवस, ग्रामपंचायत सदस्य राकेश सावंत, वर्षा रेवाडकर शलाका वाडकर, वैष्णवी आजगावकर तसेच श्री गणेश तुंगार,भरमण्णा वाणी, श्री चंदू पांढरे, श्री दीपक गावडे,तसेच अन्य पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मानसी परुळेकर यांनी केले तर श्रीमती काव्या साळवी यांनी सर्वांचे आभार मानले.