श्रद्धा पदयात्रीक मित्र मंडळाची कणकवली ते शिर्डी पदयात्रा निघाली.!

Google search engine
Google search engine

कणकवली I मयुर ठाकूर : ‘ओम् साई जय साईंच्या’ जय घोषात कणकवली वासीयांचे श्रद्धास्थान श्री भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शी लिन होऊन हे पदायात्री शिर्डी साठी निघाले. बाबांचे भक्त सालाबादाप्रमाणे श्रद्धा पदयात्रीक मित्र मंडळ कणकवली ते श्री क्षेत्र शिर्डी अशा पदायात्रेचे आयोजन करतात. आज पहाटे परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथून सकाळी 6.30 वाजता ही पदयात्रा शिर्डीच्या दिशेने रवाना झाली. सदर पदयात्रा दुपारी फोंडाघाट येथील साई मंदिरात विश्रांतीसाठी जाणार असून वैभववाडी येथे मुक्कामी जाणार आहे. व पुढील प्रवास कोल्हापूर, कराड, सातारा,वाठार, लोणंद, मोरगाव, सुपे, शिरुर, अहमदनगर बायपास मार्गे श्री क्षेत्र शिर्डी येथे असणार आहे. सदर पदयात्रेत अध्यक्ष विशाल कामत, राजन परब, मयूर चव्हाण,अक्षय भोगटे,सुरज घाग,उमेश बोभाटे,साईप्रसाद पाटकर, रघु शेळके, संतोष सावंत,प्रदीप साठम,चंदन पाटील, विनोद जाधव, गौरेश लोकरे, बाळा लोके, वैभव मालंडकर,तुषार गोळवणकर,सुजित बाईत कोल्हापूर येथील रोहित, राजू हडकर, प्रकाश शिंदे अमन अशोक बिरमोळे, वेंगुर्ला येथील जिजि, विवेक अनिल शहापूरकर, राजेश पाडावे असे बाबांचे भक्त या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. पुढील १० दिवसांपेक्षा जास्त प्रवास पायी असल्याने प्रत्येक साई भक्तांची काळजी श्रद्धा पदयात्री मित्र मंडळाच्या वतीने केली जाते. या पदयात्रे दरम्यान बाबांचे नामस्मरण तसेच तर रात्री मुक्कामी बाबांची महाआरती करून महाप्रसाद केला जातो. अतिशय भक्तिमय वातावरणात ही पदयात्रा होत असल्याने पदयांत्रिकांचा आलेख दरवर्षी उंचावत असतो.