देवरुख (प्रतिनिधी) मा.विलासजी होडे स्मृतिगंध गौरवग्रंथ समिती आयोजित मा. विलासजी होडे यांचा १५ वा स्मृतीदिन कार्यक्रम व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा देवरूख येथील कुणबी भवन येथे दि. १ जुलै २०२३ रोजी सकाळी१०.३० ते दुपारी २.३० या वेळेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात श्री.महेंद्र करंबेळे व श्री.गणपत भायजे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कु.प्रगती शिंदे व कु.सेरेना पंडव यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली तसेच श्री. मारुतीकाका जोयशी, श्री.श्यामराव सावंत, श्री. तुकाराम करंबेळे,श्री. रत्नाकर बेटकर,श्री. मनोहर हातीम यांना जीवगौरव सन्मान देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.उदय सामंत,आमदार श्री.शेखर निकम,माजी आमदार श्री.रवींद्र माने, माजी आमदार श्री.सदानंद चव्हाण, श्री.अविनाश लाड, श्री.संतोष थेराडे, माजी कुलगुरु डॉ.श्रीरंग कद्रेकर, श्री.बाळासाहेब पाटणकर, श्री. बारक्याशेठ बने, श्री.रोहन बने, श्री.सुरेश भायजे, श्री.राजन देसाई, श्री.शंकर भुवड, श्री.राजेंद्र सुर्वे, श्री.राजन देसाई, श्री.अभिजित हेगशेट्ये, श्री.प्रकाश कांबळे, श्री.संजीव अणेराव, श्री. चंद्रकांत परवडी, श्री.राजन इंदुलकर, सौ.दीपिका जोशी, श्री. शरदचंद्र गीते, डॉ.सुरेश जोशी, श्री.नंदकुमार मोहिते, डॉ. श्यामकांत गजमल, अँड. संदिप ढवळ, श्री. नारायण भुरवणे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच विलास होडे यांचे नातेवाईक,कार्यकर्ते व चाहते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सू आर्ते यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शांताराम भुरवणे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.मिलिंद कडवईकर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.सुरेश पातेरे यांनी केले. मा. विलासजी होडे : एक संघर्षमय जीवन… या स्मृतिगंध गौरवग्रंथाचे संपादन प्रा. संदिप येलये यांनी केले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.विलास डिके, श्री. राजेंद्र पोमेंडकर,श्री.अशोक धामणे, श्री.राजेंद्र धामणे, श्री.सुरेश दसम, श्री.विनय होडे, श्री.प्रदीप सोलकर, अयुब कापडी,श्री.भाऊ कांगणे,श्री. बाळू होडे,श्री.राजाराम पड्ये, श्री. तानाजी कुळ्ये इत्यादी समितीतील सर्व सदस्य व संपादक मंडळ यांनी खूप मेहनत घेतली.