कुडाळ । प्रतिनिधी : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानव विकास संस्था यांच्यावतीने कुडाळ मराठा समाज हॉल येथे गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कुडाळ गटशिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर तसेच अणाव येथील संविताश्रमचे प्रमुख संदीप परब, कोकण विभाग प्रमुख बापू परब, कोकण विभाग सल्लागार जोवेल डिसिल्वा तसेच डॉ. बापू भोगटे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मध्ये १० अनाथ व दिव्यांग बांधवांचा तसेच पर्यावरणसाठी काम करणाऱ्या संस्थाचा गौरव तसेच पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व शिक्षक याना सन्मानित करण्यात आले.