संगमेश्वर l प्रतिनिधी : संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सुरेश ठाकूर गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.
या अगोदर पावस पोलीस ठाणे तसेच बाणकोट पोलीस ठाणेपदी त्यांनी कारभार सांभाळलेला आहे नुकतीच त्यांची संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झालेली आहे. संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखली जाईल. स्थानिक पातळीवरील विविध समस्या स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी व्यापारी आणि नागरिक यांच्या सहकार्यातून सोडलं जातील असे त्यांनी सांगितले
फोटो ओळी- संगमेश्वर पोलीस ठाणेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झालेले सुरेश ठाकूर गावित यांचे संगमेश्वर पत्रकारांच्या वतीने स्वागत करताना मकरंद सुर्वे,दीपक भोसले आदी